होळीसाठी विशेष मास्क बाजारात विक्रीला

Foto
औरंगाबाद : होळी म्हणजे रूसवे-फु गवे सोडून मन जोडणारा सण. अगदी लहान्यापासून ते मोठ्यापर्यंत सर्वच जण रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी करत असतात. परंतू,काही जणांना रंगाची अलर्जी असल्यामुळे रंग खेळता येत नाही. त्याच्यासाठी खास विशेष मास्क बाजारात विक्रीसाठी आले आहे. त्यामुळे रंगपंचमीचा मनसोक्‍त आनंद लुटता येणार आहे.
होळीच्या दुसर्‍या दिवशी रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली जाते. मोठ्या पासून ते लहानापर्यंत सर्वच सण रूसवे-फु गवे सोडून रंग खेळत असतात. यावर्षी होळीच्या निमित्ताने रंग आणि पिचकार्‍या मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आल्या आहे. भारतीय बनावटीचे रंग, नैसर्गिक रंग, हरबल रंग बाजारात विक्रीस आले आहेत. यावर्षी होळीसाठी नैसर्गिक रंग असे असले तरी तोंडाला संरक्षण मिळावे यासाठी विशेष मास्क विक्रीसाठी बाजारात आले आहेत  अनेकांना रंग खेळण्याचा आनंद लुटण्याची इच्छा असते. परंतु काही जणांना रंगाची अलर्जी असते. त्यामुळे ते घराच्या बाहेर निघत नाही. परंतु अशा लोकांना रंगपंचमीचा आनंद घेता यावा, या उद्देशाने रंग विक्रेत्यांनी मास्क व्रिकीसाठी आणले आहेत. यामुळे यावर्षी रंगाची अलर्जी ची भीती राहणार नाही. अनेक जण तोंडाला मास्क लावून मनसोक्तपणे रंगाची उधळण करू शकतील असे निखिल मकरिये यांनी सांगितले.
  विविध आकाराच्या पिचकार्‍या
होळी सणात रंग भरण्यासाठी बाजारात विविध प्रकारच्या आकर्षक पिचकार्‍या विक्रीस आल्या आहेत. त्यात टँक आकारातील पिचकारी, लहान, मोठ्या आकाराच्या पिचकार्‍यांचे सर्वाधिक आकर्षण असणार आहेत.
याशिवाय लहान मुलासाठी  डोरेमोन,  छोटा भीम, नोबिता सह आदी कार्टून चित्र असलेल्या पिचकार्‍यांचे विकीसाठी आल्या आहेत.